शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:52 IST)

खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाचा संसर्ग

खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये मागील चार दिवसांपासून उपचार सुरु आहेत.दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजे यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले.त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या.त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.मात्र पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.
 
यावेळी संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला होता व काही लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील एकदोन दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.