बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (08:23 IST)

पुण्यातील ‘त्या’ हॉटेल मालकाची हत्या व्यावसायिक स्पर्धेतून,आठ जण अटकेत

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे (वय 38) यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आखाडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून व्यावसायिक स्पर्धेतून रामदास आखाडे यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
पोलिसांनी या प्रकरणी बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56),निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24),निखिल मंगेश चौधरी (वय 20), गणेश मधुकर माने (वय 20), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23),अक्षय अविनाश दाभाडे (वय 27) करण विजय खडसे (वय 21) आणि सौरभ कैलास चौधरी (वय 21) या आठ जणांना अटक केली आहे. तर हत्तेत प्रत्यक्ष सहभाग असणारे दोघे जण अद्यापही फरार आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,18 जुलै च्या रात्री रामदास आखाडे हॉटेल गारवाच्या बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या रामा वायदंडे याने तलवारीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार केले आणि तो पळून गेला.गंभीर जखमी झालेल्या रामदास आखाडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
 
पोलिसांच्या तपासात रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला असल्याचे निष्पन्न झाले. गारवा हॉटेल शेजारी आरोपी बाळासाहेब खेडेकर यांचे हॉटेल होते. रामदास आखाडे यांचे हॉटेल कायमस्वरूपी बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले होते.संसार स्वरूप चौधरी याने इतर आरोपींच्या मदतीने आखाडे यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.