1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (23:42 IST)

राज ठाकरे यांनी लावले मास्क, घेतली बाबासाहेब पुरंदरे यांची भेट

/raj-thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज भेट घेतली. ठाकरे आणि पुरंदरे यांच्यामध्ये कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आजच्या भेटीत एक विशेष गोष्ट म्हणजे, राज ठाकरे यांनी मास्क लावला होता. ऐरवी कार्यकर्त्यांमध्ये असताना ही ते मास्क लावताना दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मास्क न लावल्यामुळे ही ते चर्चेत आले होते. पण सगळ्यांनी मास्क लावला होता. म्हणून मी लावला नाही. असं त्यांनी म्हटलं होतं.
 
राज ठाकरे  यांच्या या 3 दिवसाच्या या दौऱ्यामध्ये ते पक्षाचे नेते, प्रभाग अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठका घेणार आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.