गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (09:01 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (वय ६०) यांचे रात्री निधन झाले. पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. चार दिवसांत बरे होऊन ते पुन्हा मतदारसंघांमध्ये फिरू लागले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने, पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने, तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. 
 
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा भारत भालके हे प्रतिनिधीत्व करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांचे निधन झाले. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती.