गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (07:44 IST)

कोरोना प्रतिबंधासाठी पुण्यात नवीन नियमावली, मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून एक हजारांचा दंड

मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वाढता कोरोना लक्षात घेता शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. 
 
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासंह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार पुणे शहरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यात सलग दुसऱ्यांदा मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून एक हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
 
पुण्यात पहिल्यांदा एखादा व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास 500 रुपये दंड करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा तोच व्यक्ती जर मास्क न घालता आढळला, तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडे आधीपासूनच व्यवस्था करण्यात आली आहे.