शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (10:33 IST)

राज्यात ललित कला अकादमीचे केंद्र मंजूर

केंद्राने महाराष्ट्र राज्यात ललित कला अकादमीचे केंद्र मंजूर केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील १५ एकर जागेवर ललित कला अकादमीच्या केंद्राची स्थापना होण्याची शक्यता आहे.
 
देशामध्ये दिल्ली, लखनऊ, कोलकाता, चेन्नई आणि भुवनेश्वर येथे ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र कलाकारांची उपेक्षा झाली होती. हे केंद्र राज्यामध्येही उभारले जावे, यासाठी राज्यातील कलाकारांनी विविध पद्धतीने ४० वर्षे आंदोलने केली होती. राज्यातील कलाकारांच्या या संघर्षांला यश मिळाले असून, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात हे केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली असल्याचे ललित कला अकादमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रकार उत्तम पाचारणे यांनी सांगितले. 
 
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील १५ एकर जागेवर सध्या बाल विकास केंद्र कार्यरत असलेल्या ठिकाणी ललित कला अकादमीचे केंद्र उभारले जाण्याची शक्यता आहे.