शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (07:54 IST)

पुन्हा एकदा पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली

राज्यात आता मुंबई, अमरावतीनंतर पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.पुण्यात शुक्रवारी १ हजार १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९६ हजार ५८२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून पुणे हे फक्त महाराष्ट्रातील नाहीतर देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट होते. सुरुवातीला मुंबईप्रमाणे पुण्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. पण मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत होती. पण पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात पुण्यात ४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ८१ हजार २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात सध्या २ हजार ४७० रुग्ण हॉस्पिटलमध्ये आयसोलेटेड असून ३ हजार ८९२ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. पुण्यात आज ७ हजार ९०८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत २२ लाख २४ हजार ६१० कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत.
 
पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी २८१ नव्या रुग्णांची नोंद झाली ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २ हजार ६९८वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ८२८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून २ हजार ७०५ कोरोनामुक्त झाले आहेत.