सोमवार, 7 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 एप्रिल 2025 (18:51 IST)

ससून रुग्णालयाच्या गच्ची वरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

पुण्यातील ससून रुग्णलयाचा गच्चीवरून उडी मारून रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. 
दशरथ सुरेश मेढे असे मयतचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मेढे यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानन्तर त्यांनी कुटुंबियांना त्रास देण्यास सुरु केले. त्यांना अस्वस्थता जाणवल्यावर कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात दाखल केले.तिथे त्यांच्यावर उपचार सुरु झाले. 
शुक्रवारी सकाळी 7 :30 वाजेच्या सुमारास मेढे यांनी ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit