मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2024 (10:00 IST)

पुणे पोर्श प्रकरण: अटक केलेल्या एका डॉक्टरची प्रकृती खालावली

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्त अहवालात फेरफार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यावर पोलिसांनी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक केली. डॉ.श्रीहरी  हळनोर आणि डॉ.अजय तावरे असे यांचे नाव आहे. 

अटक करण्यात आलेल्या डॉ.श्रीहरी हळनोर यांची प्रकृती अचानक बिघडली. हळनोरने इन्फेक्शन झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. श्रीहरी  हळनोरवर त्याचा सहकारी डॉ. अजय तावरे याच्या सांगण्यावरून अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. श्रीहरी हळनोर हे ससून हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत, तर डॉ. अजय तावरे हे ससून हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजीचे प्रमुख आहेत.

डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना सध्या कोठडीत इन्फेक्शनचा त्रास होत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं नसून सध्या कोठडीत ठेवलेलं आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.  
 

अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन आरोपीला 19 मे रोजी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, मुलाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरला पैशाचे आमिष दाखवले. श्रीहरी हरलोल यांनी मुलाच्या रक्ताचा नमुना घेतला होता, पण त्यात अल्कोहोल असू शकते हे लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नाही तर हा गुन्हा लपवण्यासाठी रजेवर असलेले डॉ.अजय तवरे यांनी विशेष हस्तक्षेप केला. यानंतर दुसऱ्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले, मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन रुग्णाच्या रक्ताचा नमुना डीएनए चाचणीसाठी दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. तपास केला असता रक्ताचे नमुने बदलल्याची बाब समोर आली.
 
पुणे पोर्श घटनेबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. काल, अल्पवयीन आरोपीचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्यामध्ये तो कारमधून बाहेर पडताना दिसत होता. हा व्हिडिओ घटनेच्या दिवशीचा होता. एका क्लबमध्ये जाण्यापूर्वी हा व्हिडिओ काढण्यात आला असून, त्यात त्याचे काही मित्रही त्याच्यासोबत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस त्या दिवशीचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत. विविध ठिकाणांहून 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात  असल्याचे  पोलिसांनी सांगितले.  

Edited by - Priya Dixit