सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (20:10 IST)

पुणे अपघात प्रकरणात विशाल- शिवानी आणि अश्फाकची येरवडा कोठडीत रवानगी

court
पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई वडील आणि अश्फाक मकानदार यांना येरवडा कोठडीत पाठवण्यात आले आहे.अल्पवयीन मुलाने मद्यपान करून वेगाने कार चालवत दुचाकीवरील दोन अभियंताना उडवले होते. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 
 
अल्पवयीन मुलाला वाहन दिल्या प्रकरणी वडिलांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने मुलाच्या आईने बदलले होते. या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि अशफाक मकानदार याचा समावेश होता. या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली.
 
त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली असून पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता कोर्टाने त्या तिघांची रवानगी येरवडा कारागृहात केली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit