गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (17:13 IST)

पुणे अपघात प्रकरण: निबंध लिहायला सांगणारेही अडचणीत

Pune accident case
पुण्यातील कल्याणीनगर भागातील पुणे पोर्श अपघातात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. एका अल्पवयीन मुलाने मद्यपान करून दुचाकीला धडक दिली त्यात दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला रास्ता अपघातांवर 300 शब्दांचा निबंध लिहायला लावला आणि जामिनावर सोडून दिले. या वरून चांगलाच गदारोळ झाला आणि मुलाच्या वडिलांना,आजोबांना पब मालक, व्यवस्थापक, आणि दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जामीन देताना अनेक अटी घालण्यात आल्या होत्या या मध्ये रास्ता अपघातांवर निबंध आणि 15 दिवस वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटी समाविष्ट आहे. 

अल्पवयीन मुलाला जमीन देताना घातलेल्या अटी आणि जामीन प्रक्रिया या संदर्भात चौकशी केली जाणार. चौकशीचा अहवाल आल्यानंतर सदस्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

घटनांची रिक्रिएशन होणार असून या साठी  AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Edited by - Priya Dixit