मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पिंपरी , शनिवार, 4 जुलै 2020 (09:25 IST)

पिंपरी चिंचवडचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून श्वाच्छोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते अवघे ४८ वर्षांचे होते..

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपला जनसंपर्क सुरू ठेवला होता. गरजू लोकांना धान्य आणि इतर मदत केली. लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान, श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्राणज्योत माळवली.