सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (13:34 IST)

सोलापूर महामार्गावर धावत्या बस ने पेट घेतला, सुदैवाने जीवित हानी नाही

सोलापूर महामार्गावर कदम वस्ती ग्राम पंचायत हद्दीत ग्रॅन्ड हॉटेलच्या समोर एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 
 
ही बस हैदराबादहून पुण्याच्या दिशेने जात असताना बसमध्ये एकूण 17 प्रवाशी प्रवास करत असताना कदम वस्ती ग्राम पंचायत बस आली असता बसचे टायर फुटून बसने पेट घेतला. या घटनेत सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसने पेट घेतला तेव्हा प्रवाशी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. 

वाहनचालकाला हे लक्षात आल्यावर त्याने बसमधील सर्व प्रवाशांना तातडीनं बसमधून आरडा ओरड करत खाली उतरायला सांगितले. पाहता पाहता क्षणातच संपूर्ण बस ने पेट घेतला. 
घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यावर त्यांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. वाहनचालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. 
Edited by - Priya Dixit