बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (12:22 IST)

Pune: बेपत्ता तरुणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याजवळ आढळला

death
पुण्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याजवळ सापडला आहे. हा तरुण रविवार पासून बेपत्ता होता. ध्रुव स्पनिल सोनावणे (18) असे या मयत तरुणाचे नाव आहे. ध्रुव मुलाचा अमळनेरचा असून पुण्यातील बावधन परिसरात राहणारा होता. त्याचे आईवडील अमळनेर त्यांच्या गावी गेले असता तो घरात एकटाच होता. रविवारी तो बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता.

रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा परिसरात त्याचे लोकेशन असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी शोध घेत असताना खंबाटकी बोगदा परिसरात रस्त्यालगतची झुडपे काढत असताना त्यांना एक दुचाकी दिसली पुढे शोध घेत असताना त्यांना ध्रुवचे मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.  
 
 Edited by - Priya Dixit