1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (11:10 IST)

पुणे: भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

Dagdusheth Ganapati
आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. चंद्रयान 3 चंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकेल अशी अपेक्षा आहे.14 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेलं चंद्रयान - 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी आणि भारताच्या शास्त्रज्ञांना यश मिळो या साठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट  कडून मंदिरात पहाटे महाअभिषेक केला गेला. अभिषेकला दूध, दही, फळे, सुकेमेवे फळांचा रस वापरण्यात आला. 

आज भारतासाठी मोठा दिवस असून भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी गणपतीला अभिषेक करण्यात आला. या वेळी गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावले होते. मोहीम यशस्वी होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली. 
 
आज संध्याकाळी ठीक 6:40 वाजता, जग त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होईल जेव्हा विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ असेल. या ऐतिहासिक क्षणासह भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश बनेल.
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वाकांक्षी तिसऱ्या चंद्र मोहिमेचा एक भाग असलेल्या चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. असे झाल्यास, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश बनून इतिहास रचेल.
 
 

Edited by - Priya Dixit