शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (07:38 IST)

कोविड सेंटरमध्ये चोरी करणारे दोघे गजाआड

पुण्यात  बाणेर परिसरात उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये बाणेर परिसरात उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांचे मोबाईल, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला जात. याचा शोध घेतला  असता  सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यात  साफसफाई करताना शारदा अंबिलढगे ही चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आली. महिला आरोपी शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा. थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणी) असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. 
 
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात पुणे महानगरपालिकेने कोविड रुग्णालय ऑक्टोबर २०२० मध्ये उभारल्यानंतर एका संस्थेला चालविण्यास दिले. त्या रूग्णालयात ३०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. हे रुग्णालय कोविड रुग्णां करिता असल्याने रुग्णांशिवाय इतरांना आतमध्ये प्रवेश नाही.
 
तक्रारींनंतर आतमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यात रुग्णाच्या बेडजवळ साफसफाई करताना शारदा अंबिलढगे ही चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आली. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिच्यासह साथ देणाऱ्या अनिल संगमे यालाही अटक करण्यात आली असून, १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि ऐवज चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे.