शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (15:03 IST)

PM मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी नाराज, म्हणाल्या - मुख्यमंत्र्यांना कठपुतळी म्हणून सोडले जाते, आम्हाला बोलण्याची परवानगीही नव्हती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोरोना विषाणूची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील 10 राज्यांच्या 54 जिल्हा दंडाधिकार्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पण बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदींशी झालेल्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन सभेत त्यांना बोलू दिले नाही असा आरोप केला.
 
केंद्राकडे ना कोणते धोरण, ना कोणती उपाययोजना, असे असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले जात नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
 
आम्हाला बोलूच दिले जात नाही : ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलेले नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले जात नाही, असा थेट आरोप ममता बनर्जी यांनी केला आहे.
 
भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोलले नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
 
कोरोना कमी होत असल्यांचे मोदी म्हणाले. मात्र आधीही असेच झाले होते. आम्ही तीन कोटी लसीची मागणी करणार होतो. मात्र काहीच बोलू दिले नाही. या महिन्यात 24 लाख लसी मिळणार होत्या, मात्र केवळ 13 लाख लसी मिळाल्या, असे ममतांनी सांगितले आहे.