शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (07:26 IST)

पुणेकरांनो सावधान…गाड्यांना आरसे बसवा.............अन्यथा

पुणेकरांनो सावधान…गाड्यांना आरसे बसवा अन्यथा पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग तुमची वाहने अडवून कारवाई करत दंड वसूल करू शकतो. आता अनेकांनाच प्रश्न पडला असेल या आरसे अन कारवाईचा संबंध काय.? पण नव्या वर्षात वाहतूक विभागाने “आरसे” नसणाऱ्या वाहनांवर जोरदार कारवाई सुरू केली असून, जवळपास 6 हजार वाहन चालकांवर कारवाई केली आहे. पण, अनेकांना प्रश्न पडला आहे तो आरसे नाही हा नियमभंग आहे.? पण पुणे पोलिसांच्या कारवाईने पुणेकर हैराण झाले आहेत.
 
पुणे पोलिसांनी  काही वर्षात हेल्मेट अन बेशिस्त वाहन चालकांवर जोरदार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. 100 कोटींच्या जवळपास वर्षाला पुणे पोलीस दंड करत आहेत. पुन्हा वसुलीसाठी घोळक्याने रस्त्यावर उभा राहत हा दंड वसूल केला जात आहे.पण आता बहुतांश पुणेकरांना नवीन असणारे “आरसे” कारवाई सुरू केली आहे. विशेषकरून ही कारवाई दुचाकीवर केली जात आहे. दोन्ही बाजूचे आरसे नसतील तर वाहतूक पोलीस त्यावर 200 रुपये दंड करत आहेत. त्यामुळे वाहन चालक चांगलेच बेजार झाले आहेत.
 
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुणे पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली. गेल्या 13 दिवसात वाहतूक पोलिसांनी 6 हजार 248 वाहनावर कारवाई केली आहे. त्यात साडे बारा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. खरं म्हणजे, अनेक दुचाकी चालकांना तर आरसे नसल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा भंग होतो याची कल्पना देखील नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करताना वाहतूक पोलीस व वाहन चालक यांच्यामध्ये वादावादी होत असल्याचे दिसत आहे.