सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (22:01 IST)

काय म्हणता, इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी चोरले तब्बल 26 महागडे स्मार्ट फोन

पुण्यात प्रियसी इम्प्रेस करण्यासाठी दोघे मोबाईल फोन चोरत होते. या दोघांनी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाइल चोरी करण्याचा सपाटा लावला होता. अखेर त्यांच्या मुसक्या आवळून 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. सागर मोहन सावळे (वय-22 रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), निलेश देवानंद भालेराव (वय-19 रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई भोसरी येथील पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाचे खाली करण्यात आली. पोलिसांनी तब्बल सहा तास सापळा रचून आरोपींना अटक केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाखाली दोन तरुण होंडा शाईन (एमएच 14 एचबी 3909) वरुन येणार आहेत. या दोघांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे असलेली दुचाकी त्यांनी सोमवारी (दि.11) पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे स्पष्ट झाले. आरोपींची अंगझडती घेतली असता 8 मोबाईल मिळून आले. पोलिसांनी दुचाकी आणि मोबाइल जप्त करुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यात पोलिसांना वेगवेगळ्या कंपन्यांचे 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी असा एकूण 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
आरोपी सागर आणि निलेश यांच्या प्रेयसीला स्मार्ट फोनचे आकर्षण होते. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी मोबाइल चोरी केली. चोरलेले मोबाइल प्रेयसीला देत होते. काही दिवसांनी मोबाइल चोरून तो प्रेयसीला वापरण्यास देऊन पहिला फोन काढून घेयचा. त्या फोनची विक्री करुन त्यातून मिळालेल्या पैशावर मौजमजा करायची, मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.  आरोपींनी पिंपरी -3, भोसरी एमआयडीसी -2, भोसरी – 3 आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.