शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (21:49 IST)

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! बापाकडून सलग चार वर्षे दोन मुलींवर बलात्कार

Father rapes two girls for four years pune kondhva
पुण्यात कोंढवा परिसरात एका नराधम पित्याने पोटच्या मुलींवर बलात्कार केला आहे. आरोपी वडील अल्पवयीन मुलींवर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. पीडित मुलींच्या आईने फिर्याद दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोंढवा परिसरात आरोपी पत्नी आणि चार मुलींसह वास्तव्यास आहे. त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. आरोपी दोन्ही नऊ वर्षांच्या मुलीवर २०१६ पासून लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराची माहिती पत्नीला मिळाली. त्यावर आरोपी पतीने पत्नीला कोणाला सांगितलं तर मुलींना ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. या भीतीपोटी पत्नी कोणाला सांगत नव्हती. पण त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार एका वकिलाला समजला. त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आईला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी तिने सगळा प्रकार सांगितला”.
 
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपी पित्याला अटक केली आणि न्यायालया समोर हजर केले. याप्रकरणी १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.