मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (21:43 IST)

काय म्हणता, संजय राऊत यांचे ‘ते’ट्विट धनंजय मुंडे यांच्यासाठी?

Indian politician from shiv sena Sanjay raut
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले  ट्विट  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ज्येष्ठ तत्ववेत्ता याचे एक वाक्य राऊत यांनी ट्विट केले आहे. अरिस्टॉटल म्हणतो की, जर तुम्हाला वाद टाळायचा असेल तर एकच पर्याय आहे. काही करु नका. काही बोलू नका आणि काही नाही. असे ते वाक्य आहे. सध्या मुंडे हे वादात सापडले आहेत. एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करीत पोलिस तक्रार दिली आहे. त्यामुळे राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता केलेले हे ट्विट मुंडे यांच्या कडेच अंगुली निर्देश करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.