शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (08:35 IST)

पुणे –घरपोच मोफत वाचनीय पुस्तके हवी आहेत? तातडीने येथे माहिती द्या

book
पुणे –आपले राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर रोजी आपण ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करतो. याच दिवसाचे औचित्य साधून बालक-पालक फाउंडेशनने ‘वाचन साखळी’ हा उपक्रम राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रभरातील सुमारे ११ (औरंगाबाद, जालना, नांदेड, जळगाव, हिंगोली, नाशिक, रायगड, ठाणे, सातारा, कोल्हापूर व पुणे) जिल्ह्यांतील ५० निवडक शालेय मुलांपर्यंत कलामांची काही व इतर विविध वाचनीय पुस्तके नुकतीच पोस्टाने घरपोच पाठविली.
 
आपल्या नावाचा छापील पत्ता असलेले पाकीट मुलांना प्राप्त होत असल्याने स्वत:ची ओळख व आत्मविश्वास मिळण्यास या निमित्ताने मदत होणार आहे. पुस्तक वाचून झाल्यावर आपल्या मित्र मैत्रिणींना ते वाचायला देऊन ही मुले आपली एक वाचनसाखळी तयार करणार आहेत. फाउंडेशनमार्फत चालू शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रभरातील ग्रामीण व निमशहरी भागांतील एक हजार मुलांची वाचनसाखळी या निमित्ताने तयार केली जात आहे. आत्तापर्यंत सातशे अधिक मुलांनी ऑनलाइन नावनोंदणी केली असून, त्यातून निवडलेल्या १६० मुलांपर्यंत पुस्तके रवाना झाली आहेत. संस्थात्मक आणि व्यक्तिगत देणगीदारांच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
चांगलं काही दाखवलं, की त्यावर नजर पडतेच, आपोआप हात लागतात, त्यातले शब्द वाचले जातात. हळूहळू त्याची सवय लागते आणि पुढे गोडी. अर्थात छोट्यांना चांगलं कही दाखवणं हे मात्र मोठ्यांचं काम असतं. मग मुलांच्या हातात पुस्तकं दिली तर? नक्कीच त्यांना वाचनाची गोडी लागू शकते.
– टीम, बालक-पालक फाउंडेशन
 
Edited By- Ratnadeep Ranshoor