गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:19 IST)

तरुणीवर लोणावळा येथे बलात्कार ,गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघांवर गुन्हा

Rape of a young girl in Lonavla
पुणे : पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला.त्यातून ती गर्भवती राहिली असताना गोळ्या देऊन तिचा गर्भपात करणार्‍या डॉक्टरासह दोघांवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आशिष शैलेश सपकाळ  (वय ३४, रा.लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार (रा. धन्वंतरी हॉस्पिटल, धानोरी - अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मांजरी (Manjari)येथील २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.हा प्रकार सप्टेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान घडला होता. फिर्यादी आणि आरोपी सपकाळ हे ओळखीचे आहेत.सपकाळ याने आपले लग्न झाले असल्याचे लपवून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले.घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केले.तसेच लोणावळा (Lonavala), वडकी (Wadki), भेकराईनगर येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवले.त्यातून त्यांना पावणे दोन महिन्यांच्या गरोदर राहिल्या असताना त्यांना गोळ्या देऊन डॉक्टरकडून गर्भपात (Abortion) करविला.तसेच फिर्यादी यांच्या सोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ,फोटो फिर्यादीच्या परवानगीशिवाय काढले.फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.म्हणून फिर्यादीने तक्रार दिली असून ही फिर्याद वानवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.