1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2024 (17:39 IST)

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून प्रस्थान केले

यंदा संत तुकाराम महाराजांचा 339 वा पालखी सोहळा केला जात असून टाळ-मृदंगाच्या गजरात, जय हरी विठ्ठल नामाच्या घोषणेत संत  तुकाराम महाराजांची पालखी देहूक्षेत्रातून शुक्रवारी 28 जून रोजी दुपारी 2 वाजता पंढरपूरच्या दिशेने निघाली. पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार साहेबांच्या वाड्यात आहे. 

शुक्रवारी पहाटे देहूच्या मुख्य मंदिरात महापूजा संपन्न झाली. नंतर वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा करण्यात आली. तपोनिधी नारायण महाराज समाधीवर पूजा केली. तुकोबा महाराजांच्या पादुकांना चकाकी देण्यात आली नंतर त्यांना इनामदार वाड्यात आणण्यात आले. नंतर त्यांना मुख्यमंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आले. सकाळी 10 ते 12 या कालावधीत पालखी सोहळा सप्ताहाचा काला करण्यात आला नंतर मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.

हा पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णव इंद्रायणी काठी जमले होते. लाखो भाविक राज्यभरातून या सोहळ्यासाठी देहूत आले आहे. मानाचा वारकरी आणि पाहुण्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. नंतर पादुकांना पालखीत विराजमान करण्यात आले.  

पालखीने प्रस्थान केल्यावर टाळ मृदूंगाच्या गजरात परिसर दुमदुमले. वारकरी उत्सहात नाचत गात होते. अवघा परिसर विठ्ठलमय झाला. अवघी देहूनगरी  हरिनामाच्या गजरात दुमदुमली होती. 

Edited by - Priya Dixit