1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (08:11 IST)

पुण्यात तीन दिवस शाळा बंद, आता ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणेही अशक्य

School closed
खासगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांना आता ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे राज्य शासनानेच यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असून याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ स्कूलस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे चौदाशे शाळा तीन दिवस बंद ठेवल्या जाणार आहे.
 
कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने शाळांनी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावू नये,असे परिपत्रक राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आले. त्यामुळे शाळांनी पालकांना शुल्क भरण्यास सवलत दिली. परंतु, आर्थिक स्थिती चांगली असणारे पालकही शाळांचे शुल्क भरत नसल्याचा दावा फेडरेशन ऑफ स्कूलस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
शाळांकडे जमा होणाऱ्या केवळ ३० टक्के शुल्कावर शिक्षकांचे पगार, शाळेच्या जागेचे भाडे, बँकेचे हप्प्ते आदी गोष्टीसाठी भागवणे आता शक्य होत नाही. त्यामुळे शाळांवर ऑनलाईन शिक्षणही बंद करण्याची वेळ आली आहे. शासनाने व पालकांनी शाळांची बाजूही समजून घ्यावी. यासाठी येत्या १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत शाळांचे सर्व शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घतला आहे,असेही राजेंद्र सिंह म्हणाले.