बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (08:50 IST)

डोक्याला बंदूक लावून लग्न मोडल्याचे पतीने स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले

पुण्यातील भोसरी येथे पत्नीच्या डोक्याला बंदूक लावून लग्न मोडल्याचे पतीने स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले. तसेच घटस्फोट होण्यापूर्वीच त्याने तिसरे लग्न केले. १७ मे २०१९ पासून हा प्रकार सुरू होता. पीडित महिलेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा येथील तीन आरोपींचा यात समावेश आहे.
 
आरोपी याने फिर्यादी यांच्याशी सातत्याने वाद करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांच्या आरोपी पतीने फिर्यादी यांचा गर्भपात करून त्यांची संतती नियमनाची शस्त्रक्रीया केली आहे. तसेच फिर्यादी यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लग्न मोडल्याचे लिहून घेतले. तसेच त्यांना दोन लाख २५ हजार रुपयांचा धनादेश दिला.
 
फिर्यादी व त्यांच्या पतीचा घटस्फोट होण्याआधीच आरोपी पती याने तिसरे लग्न केले. तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार अर्ज दिला होता.