1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:22 IST)

म्हणून वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या

So after going for a walk with his daughter-in-law
एका तरुणाने पुण्यातील देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरावर आपल्या वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आरोपी तरुणाने पीडित महिलेचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचं डोकं दगडानं ठेचलं आहे.काही स्थानिकांना डोंगरावरील एका झुडुपात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.याप्रकरणी माहिती समजताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी चुलत दीरास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
याबाबत माहिती अशी, हत्या झालेल्या 25 वर्षीय महिला देहूरोड येथील थॉमस कॉलनीत वास्तव्याला होत्या.तर तुकाराम कोंडीबा धडस (वय24) असं अटक केलेल्या आरोपी चुलत दीराचं नाव आहे.मृत महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेल्या होत्या.
 
दरम्यान नराधम चुलत दीराने मृत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.मात्र,पीडित महिलेनं शारीरिक संबंधासाठी नकार दिला.वहिनीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी चुलत दीराने पीडितेची थेट गळा आवळून हत्या केली आहे.त्यानंतर त्याने पीडितेची ओळख पटू नये म्हणून तिचं दगडाने डोकं ठेचलं आहे.
 
यानंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका झुडुपात टाकून दिला.त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिकांच्या मृतदेह निदर्शनास आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा छडा लावून काही तासांत आरोपी दीराला अटक केली आहे.