शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (12:36 IST)

लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी लंपास केले 1.2 कोटींचे सोन्याचे दागिने

पुण्यात व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहे. लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी  सुमारे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा आरोप आहे.
 
नेमकं प्रकरण काय
रविवार पेठेतील राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईहून बोराणा आणि मुकेश चौधरी हे पुण्यात दागिने विक्रीसाठी आले असताना ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे एक दागिन्यांच्या पेटीत सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. लहान मुलगा घेऊन आलेल्या दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने ठेवलेली पेटी लंपास केली. बोराणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे महिलांचा शोध घेतला जात आहेत.
 
या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.