मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 25 ऑगस्ट 2024 (16:49 IST)

निगडित अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैर वर्तन करणाऱ्या क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी सुनावली

jail
अद्याप बदलापूर प्रकरण तापत असताना निगडित एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ शाळेतील क्रीडा शिक्षकाने केल्याचे उघडकीस आले.सहा वर्षांपूर्वी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक छळ करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला आणि प्रकरण डांबून ठेवले म्हणून मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली तसेच शाळेतील संस्थेचे अध्यक्ष आणि इतरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी आरोपींना न्यायालयात नेले असता न्यायालयाने आरोपी क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पोलीस कोठावडी सुनावली आहे तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
सध्या ही अल्पवयीन मुलगी निगडीच्या एका शाळेत इयत्ता सातवीत शिकते.या मुलीवर शाळेतील क्रीडा शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केले पीडित मुलीशी आरोपी पीटीच्या वर्गात नेताना अश्लील चाळे करायचा आणि हे कोणाला सांगितले तर तुला ठार मारेन अशी धमकी द्यायचा.

पीडित मुलगी 21ऑगस्ट रोजी शाळेच्या वॉशरूम मधून येत असताना आरोपी शिक्षकाने तिच्याशी गैरवर्तन केले. सततच्या त्रासाला कंटाळून तिने घडलेले सर्व आपल्या पालकांना सांगितले. त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी क्रीडा शिक्षकाच्या विरोधात अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या पूर्वी देखील आरोपीवर अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. तरीही शाळा प्रशासनाने त्याला कामावर ठेवले. या मुळे त्याच्या लैंगिक छळ करण्याच्या प्रवृत्तीला वाव मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. 
 
न्यायालयाने आरोपी शिक्षकाला आणि मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
Edited By - Priya Dixit