बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (21:55 IST)

पूजा खेडकरच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी आयकर विभाग करणार

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूजा खेडकर सध्या देशभरात चर्चेत असून ऑडी गाडीवर लाल निळा दिवा, केबिन या मुळे झालेल्या वादामुळे ती चर्चेत आहे. तिच्या आईला पुणे पोलिसांनी पिस्तुलाचा धाक दाखवत मुळशी मधील स्थानिक शेतकऱ्यांना धमकी दिल्या प्रकरणी नोटीस पाठवली असून तिचे आईवडील गायब असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.आता आयकर विभाग खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आहे.

पूजाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिले.तिने हे प्रमाणपत्र कसे मिळवले यावर प्रश्न निर्माण केले जात आहे. 

अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूजा खेडकरांनी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखलाची चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल केंद्र सरकार समोर सादर करण्यात येणार आहे. 
आता आयकर विभाग खेडकर कुटुंबाचा उत्पन्नाची पडताळणी करणार असून पडताळणीत आता पुढे काय समोर येत या कडे लक्ष लागले आहे. 
 
Edited by - Priya Dixit