मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (16:36 IST)

पुण्यातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे महापालिकेनं हे सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हे कोविड सेंटर बंद करण्यात आलं आहे. या कोविड सेंटरची मर्यादा साडेतीन हजार आहे. पुणे महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने हे कोविड सेंटर चालवलं जात होतं. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
 
सध्या पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये देखील ८०० बेड पैकी ६०० हून अधिक बेड रिकामे आहेत. कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्यात उभारण्यात आलेलं जम्बो कोविड केअर सेंटर मधील ही सहाशेहून अधिक बेड सद्यस्थितीत रिकामे आहेत. त्यामुळे महापालिकेने हे साडेतीन हजार क्षमतेचं कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.