मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (16:29 IST)

राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

Raju Shetty
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं. राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली होती. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याने काळजीचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
 
कोरोनामधून बरे झाल्यानंर राजू शेट्टींनी विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून ते पुन्हा शेतकरी प्रश्न घेऊन राज्यभर दौरा करीत आहेत. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांनी राज्यात दौरा करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी केली होती.