1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (12:56 IST)

श्री क्षेत्र कोयाळी खेड यात्रेत देव दानव युद्धाचा थरार

श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची खेड येथे  भानोबाचा उत्सव तीन दिवसांचा असतो. मार्गशीर्ष प्रतिपदेला भानोबा जन्मस्थान मंदिरापासून मिरवणूक निघते. भानोबाच्या उत्सवात पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी देव-दानवांचे युद्ध खेळले जातात. हे युद्ध पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. श्री क्षेत्र कोयाळी भानोबा येथे भानोबाच्या उत्सवात हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले असून भाविकांनी यात्रेत देव-दानव युद्धाचा थरार अनुभवला. 24 नोव्हेंबर रोजी कोयाळी यात्रेच्या पहिल्या  दिवशी श्री भानोबा राहुटी मंदिरापासून ढोल- ताशांच्या गजरात भानोबा देवाच्या जनस्थळी मंदिराकडे जात असताना देव दानवांच्या युद्धाला सुरुवात झाली. भानोबांच्या समोर (मानव रुपी तस्कर )दानवांनी आपल्या हातातील शस्त्र(काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या. देवांच्या मुखवट्यावर त्यांची नजर पडतातच दानव जमिनीवर कोसळतात. 
 
या युद्धात कोसळणाऱ्या सर्व दानवांना जन्मस्थळी मंदिरा समोर उचलून आणून जमिनीवर रांगेत पोटावर निजवतात. नंतर त्यांना भानोबांचा स्पर्श देण्यात येतो आणि भानोबा देवांचे तीर्थामृत शिंपडतात. त्यानंतर या ठिकाणी असलेले अन्य तरुण भाविक त्या दानवांच्या कानात भानोबांच्या नावानं चांगभलं असे जयघोष करतात.असं म्हटल्यावर दानव भानावर येतात. 
 
शिवभक्त भानोबा देवाला कपट करून तस्करांनी (दानवांनी) मारले होते. त्यावर भानोबांनी एकदिवस माझ्यासाठी तुम्ही मारणार असा शाप दानवांना दिला. त्या शापानुसार देव आणि दानवांचे युद्ध होतात. आणि ते पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. भानोबांचा हा उत्सव तीन दिवसांचा असतो. 

Edited By- Priya Dixit