शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (14:33 IST)

पुणे बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी

crime
बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. पण अजूनही पोलिसात या घटनेची नोंद झालेली नाही.
 
सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहे. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेत हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर बुधवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor