सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (14:28 IST)

राज ठाकरेंचा अचानक पुणे दौरा

raj thackeray
राज ठाकरे आज अचानक पुणे दौऱ्यावर गेले आहेत. राज ठाकरे यांचा पुणे दौरा  नाही, त्यामुळे या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.  हा दौरा नेमका कोणत्या कारणासाठी आहे, याची अजुनही माहिती समोर आलेली नाही. काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाली आहे. तसेच पक्षाच्या प्रवक्त्यांना कोणत्या विषयावर बोलायचे कोणत्या मुद्द्यावर बोलू नये याच्या सूचना देण्यात आले आहे. 
 
काल राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि आज अचानक ते पुणे दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू आहेत. काही  महिन्यात महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमिवर हा दौरा असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 
 
दरम्यान, काल मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काही दिवसात निवडणुका लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे तसेच काही महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांची तयारी मनसेने सुरू केली आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor