शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (15:45 IST)

बारावीचा पेपर देऊन फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बारावीचा पेपर देऊन फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पुण्याच्या कासारसाई धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. 

आशिष घोगी(17) रा.सोमाटणे फाटा आणि विनय किसन कडू(17)रा.निगडी मुळगाव येळसे असे या मयत मुलांची नावे आहेत. 
 
शिरगाव-परंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वेगवेगळ्या कॉलेजातील सहा विद्यार्थी बारावीचा पेपर देऊन कासारसाई धरण येथे फिरायला गेले होते. हे सर्व जण पाण्यात उतरले. पाण्यात उतरल्यावर विनय आणि आशिष यांचा तोल गेला आहे ते पाण्यात पडले आणि पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

शिरगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल आणि स्थानिकांसह वन्यजीव रक्षक पथकाने अथक परिश्रमानंतर दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.पोलीस पुढील तपास करत आहे.