शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (12:28 IST)

देवदर्शनावरून परत येतांना विचित्र अपघातात पती-पत्नी मृत्युमुखी

अक्कलकोट येथून देवदर्शन करून पुण्याला परत येताना एका चारचाकी वाहनाला मालवाहतूक ट्रक ने जोरदार धडक दिली .या अपघातात पती- पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर-पुणे बाह्यवळण महामार्ग डोंगरे सर्कल येथे शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडला.संजीव दत्तात्रय कुलकर्णी(58) आणि सुखदा संजीव कुलकर्णी असे या मयताची नावे आहेत. 

संजीव हे आपल्या पत्नी सुखदा आणि मुलगी अनघासह कार मधून अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेले होते. ते पुण्याला परत येताना इंदापूर हद्दीत गतिरोधक पाहून त्यांनी कारचा वेग मंद केला.त्यावेळी पाठीमागून वेगाने येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने कार ला धडक दिली.  मागून लागलेल्या धडक मुळे  त्यांची कार समोर उभारलेल्या टेम्पोला धडकली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात संजीव हे जागीच ठार झाले. आणि त्यांची पत्नी सुखदा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक हा पसार झाला. ट्रॅक आणि टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.