मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (15:33 IST)

कोरोना ओसरला, कात्रजचे प्राणी संग्रहालय सर्वांसाठी आजपासून खुले

Corona Osarla
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असणारे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आता आजपासून(20 मार्च) पुणेकरांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या प्राणी संग्रहालयात आता पुणेकरांना तीन आणखी नवीन प्राणी पाहता येणार आहेत. या मध्ये जंगल केक लेपर्ड कॅट आणि शेकरू असे तीन नवीन प्राणी आहेत. तर आणखी तीन महिन्यांनी हायना आणि चौसिंगाचे दर्शन होणार आहे. 
आता आजपासून पुणेकरांसाठी कात्रज प्राणी संग्रहालयात खुले करण्यात आले असून त्यात नागरिकांना वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, अस्वल, हरीण, लांडगा ,झेब्रा हे प्राणी पाहता येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेले प्राणी संग्रहालयात नवीन प्राण्यासाठी खंदक तयार करण्यात आले आहेत.