संबंधित माहिती
- लोणावळा-कर्जत घाटात झालेल्या भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ३६ तासांसाठी विस्कळीत
- भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड घाटातील पर्यटकांचा प्रवेश बंद
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे भूस्खलन, लोणावळा-कर्जत घाट रेल्वे सेवा विस्कळीत
- महाराष्ट्रात एफडीएची पाच जिल्ह्यांत धाड, भेसळयुक्त दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश;१३ जणांना अटक
- सोनम रघुवंशीच्या चुकांबद्दल सिया गोयलने गूगलवर शोध घेतला होता, डिजिटल हिस्ट्रीमधून महत्त्वपूर्ण खुलासा
पुण्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची इमारत कोसळली, ३ कामगारांचा मृत्यू
सध्या राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातला आहे. अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपोत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रकल्पाच्या इमारतीचा एक भाग मोठ्या प्रमाणात ढिगारा कोसळल्याने कोसळला आहे. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे तर या ढिगाऱ्याखाली दबून ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर खचला. कचरा डेपोच्या आवारात असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर हा कचऱ्याचा मोठा ढिगारा प्रचंड वेगाने कोसळला. अचानक हे सर्व घडल्यामुळे इमारतीत काम करणारे कर्मचारी अडकले.
पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि बचावकार्य सुरु केला. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर पहिल्या मजल्यावर अजूनही काही लोक अडकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
Edited By - Priya Dixit
