स्टार प्रचारकांमध्ये सिद्धूचे नाही तर चन्नी यांचे नाव
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली ज्यात सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह 30 जणांची नावे आहेत. यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाचाही समावेश आहे, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांचे नाव त्यात समाविष्ट नाही.
उत्तराखंडमधील काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुलाम नबी आझाद तर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, रणदीप सुरजेवाला यांचीही नावे आहेत.