गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (15:53 IST)

केजरीवाल पत्नी सुनीतासोबत प्रचार करणार, मुलगी हर्षिताही सहभागी होणार

Punjab Election: Now AAP Convenor Kejriwal will campaign with wife Sunita
Punjab Assembly Election 2022 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याही पंजाबमधील निवडणूक प्रचारात ताकद लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते. केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवालही निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. धुरी येथे भगवंत मान यांच्या सभेला उपस्थित राहून त्या आप साठी मते मागताना दिसणार आहे.
 
पंजाबमध्ये आप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनलेले भगवंत मान 11 फेब्रुवारी रोजी धुरी येथे महिलांशी संवाद साधणार आहे. या संवादात अरविंद केजरीवाल यांची पत्नी आणि मुलगी सहभागी होणार आहे तसेच भगवंत मान यांच्या आई आणि बहिणीसोबत प्रचार करणार आहेत.