शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (16:49 IST)

कोणत्याही आमदाराच्या मुलाला चेयरमॅनशिप मिळणार नाही- सिद्धू

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वपक्षीय दिग्गज जनतेला मोठमोठी आश्वासने देत आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू हे देखील निवडणूक रॅलींदरम्यान मोठमोठी वक्तव्ये करत आहेत. यात सिद्धू यांनी लुधियाना येथील एका सभेत म्हटले की ते जर पीसीसीचे अध्यक्ष राहिले तर आमदाराच्या मुलाला अध्यक्षपद मिळणार नसून कार्यकर्त्याला मिळेल.
 
सिद्धू यांनी वचन देत म्हटले की मी पीसीसी अध्यक्षपदी कायम राहिलो तर कोणत्याही आमदाराच्या मुलाला अध्यक्षपद मिळणार नाही. ते नक्कीच कार्यकर्त्याला मिळेल. कोणाला विशेषाधिकार मिळाले तर मी राजीनामा देईन. यादरम्यान चरणजीत सिंह चन्नीही मंचावर उपस्थित होते.
 
उल्लेखनीय आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.