शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:28 IST)

माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही आपला मत दिले, पाच राज्यांतील निकालांनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

sharad panwar
5 राज्यांतील निवडणुकांनंतर आता निकाल हाती येत असताना पंजाब वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपाला सत्ता राखण्यास यश मिळाले आहे. पंजाबमधील काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने मोठा पराभव झाला आहे अशाने पंजाबमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. यावर एनसीपी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देेत म्हटले की दिल्लीतील कामगिरीमुळे आप ला पंजाबमध्ये विजय मिळाला आहे.
 
दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये पक्षाला स्वीकारलं मात्र पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही तसेच काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचार्‍यांनीही 'आप'ला मतं दिली होती.

पंजाबच्या शेतकर्‍यांमध्ये केंद्र सरकारविषयी राग होता. काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती मात्र बदल घडल्यामुळे जनतेनं नाकारलेत. 
 
कॅप्टन अमरिंदर सिंग सारख्या प्रभावशाली नेत्याला हटवण्याचा निर्णय लोकांना पसंद पडला नाही नसल्याचे दिसून आले. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या मनात जो राग होता तो निवडणुकीत दिसून आला आहे,” असे शरद पवार म्हणाले.