रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (21:37 IST)

Punjabi Recipe मका पराठा

बाजारात बाराही महीने मक्याची कणसं मिळत असतात. तर मका अगदी लहान गावापासून तर मोठ्या शहरापर्यंत उपलब्ध असतो. मक्यापासून अनेक पदार्थ केली जातात. आणि हे पदार्थ बनवणे खिशालाही परवडतात. मक्याचा पराठा हा प्रकार अतिशय चविष्ठ आहे. पंजाबमध्ये मक्याचा पराठा व साग आवडीने खाल्ले जाते.
 
 साहित्य : 2 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमच्या आल्याची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे 1/2 लहान चमचा ओवा, 1 चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.
 
कृती : मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ व आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही व लोण्यासोबत सर्व्ह करा.