शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

रगडा पॅटिस

साहित्य : वाटाणे, मीठ, हळद, तिखट, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, बारीक शेव, हिरवी व आंबटगोड चटणी.

कृती : सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे तोडे तिखट घालावे. ही उसळ मऊ शिजवून घ्यावी. यात मसाला किंवा घालत नाही.
पॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत.
त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत.
चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे.
हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत.
नंतर तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून शॅलो फ्राय करावेत.
सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटिस घेऊन त्यावर रगडा घालावा.
मग त्यावर शेव व आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात.