Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 3 जुलै 2009 (16:01 IST)
पुणे-नाशिक मार्गाला हिरवा कंदील
रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी ५३ नव्या रेल्वे मार्गांना या बजेटमध्ये मंजुरी दिली असून यात बहुप्रतिक्षित नाशिक-पुणे मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. याशिवाय नांदेड बिदर हा महाराष्ट्रातला म्हणावा असा आणखी एक मार्ग आहे. बाकी यात अहमदनगर-बीड-परळीवैजनाथ (२६१.२५ किमी), वर्धा-नांदेड (२७० किमी), मनमाड-इंदौर (३५० किमी) आणि वडसा देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली (४९.५ किमी) या मार्गांच्या प्रतिक्षेत असणार्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
पुणे- नाशिक मार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. २६५ किलोमीटरचा हा मार्ग असेल. १ हजार ४४ कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. माजी खासदार देविदास पिंगळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.