Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 3 जुलै 2009 (16:41 IST)
मुंबई प्रमाणेच महत्त्वाच्या शहरात 'महिला ट्रेन'
मुंबईमध्ये केवळ महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेन प्रमाणेच आता इतर महत्त्वाच्या शहरातही अशाच प्रकारच्या ट्रेन सुरू करण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे अर्थसंकल्पात केली आहे. महिलांचे 'टाइम टेबल' लक्षात घेऊन या गाड्यांचे वेळापत्रक ठरवण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या ही सेवा फक्त मुंबईमध्येच सुरू असून, आता दिल्ली, कोलकाता, चेन्नईतही अशाच प्रकारच्या ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.