रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव हे आपल्या आक्रमक आणि फटकळ स्वभावामुळे परिचीत असले तरी रेल्वेमंत्री म्हणून त्यांच्या काळात रेल्वेचा आलेख वाढता राहिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत प्रवाशी, माल आणि इतर वाहतूकीमध्ये वाढ झाली असून सहाजिकच रेल्वेच्या उत्पन्नामध्येही वाढ झाली आहे. ही वाढ टिकवून प्रवाशांना खुश करण्यासाठी त्यांनी काय युक्ती केली आहे ते पाहण्यासारखे आहे. गेल्या पाच वर्षांत रेल्वेचा वाढत चाललेला आलेख पाहून ही बाब लक्षात येईल.