1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. follow rules of lifestyle after locodown to keep away from coronavirus

लॉकडाऊननंतर पाळावे हे नियम तरच करोनाला लढा देता येईल

keep away coronavirus
▪️ कमीतकमी 2 वर्षे विदेश प्रवास टाळावा
▪️ कमीतकमी 1 वर्ष तरी बाहेरील बनविलेले खाद्य टाळावे
▪️ दूरचे लग्न कार्य, अनावश्यक कार्यक्रमात जाणे टाळावे
▪️ अनावश्यक प्रवास कमीतकमी 1 वर्ष टाळावा
▪️ कोणतेही गर्दीचे ठिकाण नेहमीसाठीच टाळणे तर आरोग्यासाठी योग्य ठरेल. 
▪️ आजारी व्यक्तीच्या भेटीला जाणे टाळावे
▪️ सर्दी-खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहावे, अश्या व्यक्ती घरातच असेल तर, त्याने वापरलेल्या वस्तू निर्जंतुक करण्यावर जास्त भर द्यावा
▪️ कमीतकमी 1 वर्ष तरी घराबाहेर जाताना मास्क वापरावा
▪️ जास्तीत जास्त शाकाहार करावा
▪️ येणारे 6 महिने पुढील गोष्टी निश्चय पूर्वक टाळाव्या - सिनेमा थिएटर, शॉपिंग मॉल, बगीचा, वॉटर पार्क, संग्रहालय भेटी, पार्टी, अनावश्यक मेळावा, सभा
▪️ स्वतःची व परिवाराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असेच वर्तन ठेवावे (खाद्य, व्यायाम)
▪️ सलून / पार्लर मध्ये जाताना विशेष काळजी घ्यावी
▪️ सामाजिक अंतरचे नेहमीच भान ठेवावे व जागरूक राहावे
▪️ शक्यतोवर बेल्ट, अंगठी, दागिने, घड्याळ, कडे, अंगावर धातूच्या इतर गोष्टी 1 वर्ष तरी टाळाव्या
▪️ सॅनिटायझर वापर करणे हे जीवनाचे अविभाज्य अंग बनविणे
▪️ बाहेरील पादत्राणे घरात न आणणे
▪️ बाहेरून आल्यावर हात व पाय स्वच्छ धुणे
▪️ एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास गरम पाण्याने स्नान करणे
 
कोरोनाचे संकट सहजच संपुष्टात येणार नाही म्हणून लॉकडाऊन असो वा नसो पुढील 1 वर्ष ह्या सर्व गोष्टी सातत्याने पाळणे सर्व मानव समाजासाठी लाभदायक राहील. सावधानता हीच सुरक्षा आहे. 
 
पुढील लेख
'व्होकल फॉर लोकल': 1 जूनपासून निमलष्करी दलाच्या कॅन्टिनमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील