रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (23:42 IST)

ठाकरेंची तोफ आज धडाडणार

uddhav thackeray
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला 8 जून रोजी 37 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणार्‍या 'हिंदुत्वाचा हुंकार ' या घघोषवाक्यासह मु  ख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे. सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोर्‍हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात 10 हजार भगवे ध्वज, होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकात सर्वत्र लावण्यात आले आहे.